हॉटेल चालक-मालक हैराण
| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
नवी मुंबईतील ‘सर्व्हिस बार’ आणि ‘ऑर्केस्ट्रा बार’ यांच्याशी संबंधित मुद्दा आता सर्वत्र चर्चेचा एक ज्वलंत विषय बनला आहे. सर्व आवश्यक परवानग्यांसह कार्यरत असलेल्या हॉटेल्सचे अचानक बंद होणे, याचे परिणाम केवळ नवी मुंबईच्या हॉटेल व्यवसायावरच नव्हे, तर ‘ओला’ चालक, रिक्षाचालक, तसेच रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारे पानटपरीवाले, ‘भुर्जी-पाव’ विक्रेते आणि चहावाल्यांवरही झाले आहेत. नवी मुंबईतील 23 फेब्रुवारी पासून ऑर्केस्ट्रा बार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. हे कोणत्या नियमाला धरून ना कोणती लिखित ऑर्डर ना महाराष्ट्र सरकारचा फतवा. शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी अधिवेशनात पनवेल येथील रस्त्या कडील बारचा लखलखीत बार गोंगाट, वाहतूक अडथळा अशी मांडणी केली. अधिवेशनात बारचा उल्लेख करताच हिकडं नवी मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली. कोणती ही लेखी ऑर्डर न काढताच नवी मुंबईतील बार बंद करण्याचा अलिखित फतवा निघाला.
नवी मुंबईतील सर्व्हिस बार तसेच ऑर्केस्ट्रा बार यांना परवानगी देत असताना महिला नोकर नामा हे राज्य उत्पादन शुल्क कार्यालय शासकीय चलन भरून घेऊन परवाना देत असते. राज्य उत्पादन शुल्क आणि विभागीय स्तरावरील सर्व परवानगी घेऊन ही व्यवसाय चालू होते. मग ते बेकायदेशीर कसे? हा प्रश्न हॉटेल चालक मालक उपस्थित करत आहेत. मुळात सर्व प्रकारची परवानगी घेऊन चालू असणारे सर्विस बार तसेच ऑर्केस्ट्रा बार हे नेहमी अधिवेशन काळात बंद का होतात?. हॉटेल बंद आहेत. मग परवाना नूतनीकरण करायचा कसा? हा प्रश्न हॉटेल चालकाना पडला आहे.
नवी मुंबईतील सर्व्हिस बार तसेच ऑर्केस्ट्रा बार बंद असतानाच याचे उलट महाराष्ट्रात सोलापूर, मुंबई मध्य, मुंबई पूर्व, मुंबई उत्तर तसेच मुंबई उपनगरे, ठाणे जिल्हा असेल त्यामधील मीरा रोड, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, सह रायगड जिल्ह्यातील खोपोली रोड वरील असणारे ऑर्केस्ट्रा बार असतील त्यांना सूट का? हा ही प्रश्न नियम होतो. राज्यकर्त्यांना फक्त नवी मुंबईतील सर्व्हिस बार तसेच ऑर्केस्ट्रा बारवरच अधिवेशनात मुद्दा उचलायचा असतो का? असा प्रश्न हॉटेल मालक उपस्थित करत आहेत.
नवी मुंबईतील किमान 4000हून अधिक लोक कलाकार नवी मुंबई पोलीस दलाच्या एका निर्णयामुळे बेरोजगार झाले असल्याने दुहेरी धोरणाचा आरोप होत आहे. कोणत्या ही शासकीय यंत्रणेकडून लेखी खुलासा नाही बंद का ? मग “फक्त नवी मुंबईतून जाताना नेतेमंडळींना ऑर्केस्ट्रा बार दिसतात का? हा सवाल चालक मालक उपस्थित करत आहेत. महाराष्ट्र शासनाने नियमानुसार परवानगी दिलेली असतानाही नवी मुंबईतील सर्व बार अनेक दिवसांपासून बंद आहेत. यामुळे बारमधील कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून, त्यांच्या कुटुंबांपुढे गंभीर आर्थिक संकट उभे राहिले आहे. नवी मुंबईतील सर्व ऑर्केस्ट्रा बार प्रत्येक हॉटेल मागे परवानगीच मुळात लाखो रुपये भरून करमणूक कर म्हणून दिला आहे.
सर्व परवानगी ह्या सर्व्हिस बार आणि ऑर्केस्ट्रा बार चालवणाऱ्या मालक लोकांकडे आहेत. मग कारवाईबका ? नवी मुंबई पोलिसांकडून आलेल्या या अलिखित फतव्याचा आणि हजारो लोकांच्या पोटावर टाच येईल असा आदेश काढला कोणी हे ही कळायला उत्तर नाही. दुसरीकडे, बार मालक देखील प्रचंड अडचणीत सापडले असून “कामगारांना पगार द्यायचा कुठून?”राज्य उत्पादन शुल्काची अवाढव्य रक्कम भरायची कशी, का कर्जाचा डोंगर उभा करून हा ही प्रश्न अनुत्ततरित राहतो. कायदेशीर आणि सुप्रीम कोर्टाच्या जी आर नुसार चालणारे बार अचानक बंद का?असा सवाल त्यांना पडला आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे हॉटेल चालक मालक अडचणीत आले आहेत.
रायगड मधील असणारे सर्व्हिस बार तसेच ऑर्केस्ट्रा बार यांना दारू विक्री परवानगी नोकर नामासह दिली असून बार बंद करा अथवा नोकर मनामधील कामगाराना काढून टाका असे कोणते ही आदेश राज्य उत्पादन कार्यालयाकडून दिले गेले नाहीत. दारू विक्री चालू ठेवण्यास आमची हरकत नाही.
रविकिरण कोल्हे,
अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग रायगड
