बार्डी येथील तरुणाची सेंद्रिय खतांची शेती

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यात प्रगत शेती करण्याचे पेव वाढले असून त्यात सेंद्रिय शेती करण्यावर शेतकर्‍यांचा भर दिसून येत आहे. बार्डी येथे राहणारा हेमंत कोंडीलकर या तरुणाने सेंद्रिय खतांची शेती केली असून रसायनांचा कोणताही वापर न करता कीटकनाशके तयार केली आहेत. दरम्यान, सेंद्रिय खते यांच्या माध्यमातून भाजीपाला शेती विशेष चर्चेत असून त्यांच्या शेतात अन्य भाजीपाला यांच्यासह चेरी टोमॅटो यांची यशस्वी शेती केली आहे.

कर्जत तालुक्यातील बार्डी गावातील पदवीधर तरुण हेमंत नामदेव कोंडीलकर यांनी सेंद्रिय शेतीचा पुरस्कार केला आहे. मुरूम मातीच्या जमिनीवर सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला शेती करण्याचा प्रयोग कोंडिलकर हे गेली तीन वर्षे करीत आहेत. सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला, शेतीत विविध यशस्वी प्रयोग करत असून भाजीपाल्याच्या देशी बियाणांचा वापर करून बार्डी गावातील शेतकरी परशुराम चौधरी यांच्या शेतामध्ये सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवित आहेत. यामध्ये भरीताची वांगी, गवार, भेंडी, टेमॅटो, चेरी टोमॅटो, देशी चवळीची लागवड केली आहे. या भाजिपाला पिकांसाठी लागणार्‍या सेंद्रिय खतांचा वापर केला आहे. सेंदिय खतांबरोबर किटकनाशके कोंबडीखत, दशपर्णी अक, हयुमिक ऍसिड, बायोइंजाईम, फिश ऑईल, कंपोस्ट खत यांच्यापासून स्वतः तयार केली आहेत. त्यामुळे शेतिवरील उत्पादन खर्च कमी होतो आणि लोकांना विषमुक्त भाजीपाला देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. कृषी विभागातील तालुका कृषी अधिकारी अशोक गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी दिनेश कोळी, तसेच कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक यांच्याकडून सहकार्य आणि मार्गदर्शन लाभत आहे.

Exit mobile version