| उरण | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेच्या मान्यतने द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित रायगड द्रोणागिरी श्री, रायगड द्रोणागिरी फिजिक व रायगड द्रोणागिरी उदय 2025 या शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा गुरुवारी (दि.25) सायंकाळी 4 वाजता उरणमधील बोकडवीरा येथील भव्य पटांगणात पार पडणार आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील जास्तीत जास्त शरीर सौष्ठवपटुंनी या स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धा यशस्वी करावी, अशी विनंती रायगड जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेतर्फे व द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे करण्यात आली आहे. या स्पर्धेतून विजयी झालेल्या स्पर्धकांची निवड उरण येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी होणार आहे. तसेच, यंदा महाराष्ट्रातच होणाऱ्या नॅशनल स्पर्धांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरू शकते, असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जितेंद्र गुरव व संतोष साखरे यांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606