| माणगाव | प्रतिनिधी |
शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल व विजयशेठ मेथा चॅरिटेबल ट्रस्ट माणगाव यांच्यातर्फे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर बुधवार दि. 8 एप्रिल रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत माणगाव जुन्या एसटी स्टँडजवळ महेंद्र मेथा यांच्या प्रशस्त जागेत हॉलमध्ये करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त गरीब गरजू लोकांनी घ्यावा, असे आवाहन माणगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रसिद्ध उद्योजक विजयशेठ मेथा यांनी केले आहे.
नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606