| दिघी | वार्ताहार |
सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या शाखा- वडवली, भरडखोल, श्रीवर्धन, खरसई व संदेरी यांच्या वतीने शनिवार 27 मे रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रक्तदान शिबिरामध्ये रक्तसंकलन शासकीय रक्तपेढी आलिबाग-रायगड यांच्यामार्फत होणार आहे. तरी रक्तदान शिबिरासाठी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी उपस्थित राहून रक्तदान या महान मानवी कार्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन क्षेत्रीय प्रभारी प्रकाश म्हात्रे यांनी केले आहे.