। चिरनेर । वार्ताहर ।
श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळ काळा उत्सवाचे अवचित साधून शुक्रवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी उरण तालुक्यातील विजय विकास सामाजिक संस्था नवघर उरणतर्फे दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. पहिले बक्षिस एक लाख 11 हजार 111 रुपये आहेत.उत्सवात सहभाग म्हणून सलामी देणार्या गोविंदा पथकांना 10111 रुपये व भव्य चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. या दहीहंडी उत्सवात उरण पनवेल नवी मुंबई आणि मुंबई या शहरातील गोविंदा पथक सहभागी होणार असल्याने विजय विकार सामाजिक संस्थेचा दहीहंडी उत्सव उरणकरांना परवणी ठरणार आहे.