| रायगड | क्रीडा प्रतिनिधी |
रायगड जिल्हा कॅरम असोसिएशन व झुंझार युवक मंडळ पोयनाड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा दि.19 व 20 जुलै रोजी पोयनाड येथील जय मंगल कार्यालय पांडवादेवी येथे पार पडणार आहे. ही स्पर्धा पुरुष एकेरी खुल्या गटामध्ये खेळविण्यात येणार असून रायगड जिल्ह्यातील कॅरम खेळाडूंनी शुक्रवार दि.11 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत स्पर्धा शुल्कासह आपले नाव प्रतिनिधींकडे नोंदवावे. या कॅरम स्पर्धेकरिता ‘सुरको किंग’ या कंपनीचे कॅरम बोर्ड वापरण्यात येणार आहेत. तसेच, या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील जास्तीतजास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा कॅरम असोसिएशनचे सचिव दिपक साळवी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी दिपक साळवी-पोयनाड (7020602335), सचिन नाईक-पनवेल (8850462411), पांडुरंग पाटील-कर्जत (7276347013), प्रदीप वाईंगडे-कामोठे (9773183030) आणि अमित यादव-रसायनी (9969608280) यांच्याशी संपर्क साधावा.







