नागोठण्यात जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन

| नागोठणे । वार्ताहर ।

राज्य कब्बड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष खा.सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा कब्बड्डी असोसिएशनच्या सहकार्याने शनिवारी दि.1 एप्रिल रोजी नागोठण्यातील आठवडे बाजार मैदानावर भव्य जिल्हास्तरीय आमदार चषक कबड्डी स्पर्धा भरविण्यात येणार असल्याची माहिती आ. अनिकेत तटकरे यांनी भाई टके यांच्या निवासस्थानी शनिवारी (दि.11) सायंकाळी झालेल्या बैठकीत दिली.

या बैठकीला भाई टके, शिवराम शिंदे, सदानंद गायकर, मधुकर ठमके, हरिषशेठ काळे, विलास चौलकर, लियाकतशेठ कडवेकर, चंद्रकांत गायकवाड, राकेश शिंदे, संतोष कोळी, बाळा टके, सचिन कळसकर, दिपेंद्र आवाद, अकलाख पानसरे,अतुल काळे, राजेश पिंपळे, जुगन जैन, एकनाथ ठाकूर, प्रमोद जांबेकर, राजेंद्र शिंदे, सुनिल लाड, दिनेश घाग, बाळकृष्ण देवरे, रोहिदास हातनोलकर, प्रकाश रेवाळे, किशोर कदम, विनायक तेलंगे, मोरेश्‍वर तेलंगे, बिपीन सोष्टे, अ‍ॅड. श्रीकांत रावकर, प्रथमेश काळे, सिध्देश काळे, मनोज टके, चेतन टके, अमित जांबेकर, महेंद्र हंबीर, रोशन पारंगे, कुणाल तेरडे, गुड्डु मोदी, भारत भोय, किसन बोरकर, मधुकर मढवी, किसन भोय, उमेर सांगडे, मोरेश्‍वर संगणे आदीं उपस्थित होते.

सामान्यांसाठी प्रथम क्रमांक रु. 33,333 व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक रु.22,222 व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक रु. 11,111 व आकर्षक चषक, चतूर्थ क्रमांक रु. 11,111 व आकर्षक चषक तसेच उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड व पब्लिक हिरो यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

Exit mobile version