। माणगाव । प्रतिनिधी ।
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाद्वारे उद्योजक-प्राध्यापक चर्चासत्राचे आयोजन (दि.3) जून रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 2.00 या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथे करण्यात आले होते. उद्योजक व शैक्षणिक संकुल एकत्रित येऊन विद्यार्थ्यांना करियरच्या विविध संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने तसेच उद्योग घटकांना गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ निर्मिती करण्याच्या दृष्टीने उद्योजक-प्राध्यापक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या चर्चासत्रात विद्यापीठाचे विभाग प्रमुख, महाड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन व टाटा पावरच्या एकूण 40 पेक्षा अधिक प्रतिनिधींनी सहभाग दर्शविला. या चर्चासत्रात महाड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष श्री. संभाजी पठारे यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. तर, कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. कारभारी काळे यांनी भूषविले. या चर्चासत्रासाठी डॉ. संजय नलबलवार, डॉ. नीरज अग्रवाल, डॉ. एस.एम. पोरे आणि पदविका विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरेचे प्राचार्य डॉ. मधुकर दाभाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्योजक-प्राध्यापक चर्चासत्राचे आयोजन
