नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

। माणगाव । प्रतिनिधी ।

शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल व विजयशेठ मेथा चॅरिटेबल ट्रस्ट माणगाव यांच्यातर्फे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन बुधवारी (दि.10) सकाळी 10 ते दुपारी 2 यावेळेत माणगावातील नितीन मेथा हॉल येथे करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त गरीब गरजू लोकांनी घेण्याचे आवाहन उद्योजक विजयशेठ मेथा यांनी केले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांकडून याठिकाणी नेत्ररुग्णांची तपासणी केली जात असून ज्यांना मोतीबिंदू आहे अशा नेत्ररुग्णांना पनवेल येथे घेऊन जाऊन त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया केली जाते. आतापर्यंत 2 हजारहुन अधिक मोतीबिंदू असणार्‍या रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

Exit mobile version