‘हिरवळ’मार्फत क्षेत्रभेटीचे आयोजन

| माणगाव | प्रतिनिधी |

हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट कॉलेज ऑफ सायन्स (सीएसआयटी)मधील आयटी व सीएस विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी महाड येथे असलेल्या श्री समर्थ ब्रॉडबँड आणि साईराजदीप केबल नेटवर्कला एक अभ्यासपूर्ण औद्योगिक क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांना नेटवर्किंग क्षेत्रात प्रत्यक्ष अनुभव आणि व्यावहारिक ज्ञान मिळावे या उद्देशाने या क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले. सुरुवातीला श्री समर्थ ब्रॉडबँडला भेट देऊन करण्यात आली. नेटवर्क प्रशासक धनंजय पोतदार यांनी नेटवर्किंग संकल्पनांवर माहिती विद्यार्थ्यांना समजावून सांगताना नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चरची, ब्रॉडबँड सेवांचे कार्य, सुरक्षित आणि कार्यक्षम नेटवर्क व्यवस्थापनाचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी सक्रियपणे भाग घेऊन स्वतः च्या शंकांचे समाधान केले.
यानंतर साईराजदीप केबल नेटवर्कला भेट दिली. नेटवर्क प्रशासक प्रदीप शेठ यांनी व्यावहारिक प्रात्यक्षिके करून दाखविली. नेटवर्किंग तत्त्वांचा वास्तविक जगातील वापर कसा केला जातो, यावर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना केबल नेटवर्किंगच्या स्थापनेपासून समस्या निवारणापर्यंतच्या विविध घटकांवर मार्गदर्शन केले. हिरवळ एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष किशोरजी धारिया यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबर अनुभवात्मक शिक्षण आवश्यक असल्याने विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमात सहभागी होऊन स्वतःच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारित कराव्या, असे आवाहन केले.

हिरवळ एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका सोनाली धारिया यांनीही विद्यार्थ्यांसाठी उद्योग जगताचे महत्त्व अधोरेखित करताना विद्यार्थ्यांनी त्यांचे शैक्षणिक ज्ञान व औद्योगिक ज्ञान यांच्यातील अंतर भरून काढण्यासाठी औद्योगिक भेटी आवश्यक आहेत, असे मत व्यक्त केले. हिरवळ एज्युकेशन ट्रस्टच्या मुख्य सल्लागार डॉ. संध्या कुलकर्णी यांनी शिक्षण व अनुभवांच्या महत्त्वावर विचार व्यक्त करताना तंत्रज्ञान आणि नेटवर्किंगमध्ये करिअर करण्यासाठी ही क्षेत्र भेट फायदेशीर ठरेल, असा विश्‍वास व्यक्त केला.

Exit mobile version