मार्गदर्शन मेळावा व हळदीकुंकूचे आयोजन

महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनण्यासाठी मार्गदर्शन

। उरण । प्रतिनिधी ।

श्रीया फाऊंडेशन पाले आणि कॉमन सर्विस सेंटर कोप्रोली तर्फे तालुक्यातील पाले गावात श्री हनुमान मंदिर प्रांगणात दि.21 रोजी महिला स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा व हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी माजी नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांनी सांगितले की, महिलांनी आता सर्वच क्षेत्रात पुढे आले पाहिजे. स्वावलंबी जीवन जगत आत्मनिर्भर झाले पाहिजे. स्वतः सोबत कुटुंबालाही पुढे नेले पाहिजे, असे मनोगत व्यक्त केले. तसेच, महिलांना सक्षमीकरण करणे, नागरिकांच्या अडी अडचणी सोडविणे, शासकीय दाखले, कागदपत्रे काढून देणे, महिला बचत गटांना मार्गदर्शन करणे, पुरुष व महिलांना उद्योगासाठी हातभार लावणे, गोर गरिबांच्या सुख दुःखाला धावून जाणे, अशी अनेक कामे संदीप म्हात्रे, स्मिता म्हात्रे यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सुरु असून त्यांचे कार्य हे सर्वांसाठी आदर्श व प्रेरणादायी आहेत असे गौरवोदगार काढले.
या कार्यक्रम प्रसंगी अ‍ॅड. अपर्णा शिंदे, निराबाई पाटील, देवयानी म्हात्रे, प्रणिता म्हात्रे, निलेश कुंभारे, संजीवन म्हात्रे, राजू गिते, प्रतिक पाटील, चंद्रकांत म्हात्रे, पोसुराम म्हात्रे, विष्णु म्हात्रे, सुरेश म्हात्रे, सुनील वर्तक, अमित म्हात्रे, मानसी पाटील, निशा म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अ‍ॅड.अपर्णा शिंदे यांनी महिलांनी न घाबरत व्यवसायात उतरले पाहिजे. अनेक उद्योग हे घरातूनच निर्माण झाले त्यामुळे आपल्या इच्छा शक्तीच्या जोरावर यशस्वी उद्योजिका व्हा, असा सल्ला महिलांना दिला. या कार्यक्रमात महिलांची उपस्थिती लक्षनीय होती. यावेळी महिलांना मानसी पाटील यांनी इमिटेशन ज्वेलरीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच, वेगवेगळ्या क्षेत्रातील उत्तम माहिती देण्यात आली.

Exit mobile version