पाटबंधारे खाते सेवानिवृत्त संघातर्फे मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

| माणगाव । वार्ताहर ।

माणगाव तालुका पाटबंधारे खाते सेवानिवृत्त कर्मचारी संघ यांच्या वतीने आठवा वर्धापन दिनानिमित्त मार्गदर्शन मेळावा शनिवार (दि.29) सकाळी 11 वाजता नथुराम पाष्टे यांच्या अध्यक्षतेखाली कुणबी भवन माणगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर मेळाव्यात जिल्हा कोषागार अधिकारी रमेश इंगळे व पाटबंधारे विभाग कोलाडच्या कार्यकारी अभियंता दीपिका राजभोर हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या मेळाव्यात 75 वर्षे वय झालेल्या सभासद यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमास रामभाऊ दत्तू टेंबे, शंकर पवार, बाळाराम नवगणे, टिकम भोनकर, विष्णू सावंत, काशीराम पाखुर्डे उपस्थित राहणार आहेत.

सदर कार्यक्रमास सर्व सभासदांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित रहावे असे आवाहन बाळ उभारे, नारायण मालोरे, सूर्यकांत उभारे, सुभाष दोशी, भागोजी शिर्के, नथुराम अंधेरे, श्रीराम जाधव, लक्ष्मण मुंढे, सा.रा.पालकर, शा.वि.पवार, र.बा.शेडगे, सुरेखा यादव, वैशाली बामुगडे, गणपत पालकर, विनायक सापळे, शिवाजी वाढवळ, नथुराम लहाने, रमेश डवले, वि.रा.सावंत यांनी केले आहे.

Exit mobile version