| माणगाव । वार्ताहर ।
हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, महाड व हिरवळ रात्र महाविद्यालय यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे विद्यार्थ्यांकरिता एड्स जनजागृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून डॉ. राजेश गुजर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविकात प्रा. सुदेश कदम यांनी समाजामध्ये एड्स विषयी असलेले समज – गैरसमज दूर करणे व त्याची सुरवात ही महाविद्यालयीन तरुण पिढीपासून करणे अतिशय गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. डॉ. राजेश गुजर यांनी विद्यार्थ्याना एड्स विषाणूची माहिती देऊन त्याची लागण कशी होते व ती शरीरावर काय परिणाम करते याची थोडक्यात माहिती दिली. त्याच बरोबर समाजात असलेले एड्स विषयीचे विविध गैरसमज दूर करून त्यामागील तथ्य यावर मार्गदर्शन केले. तसेच एड्स प्रतिबंधात्मक उपाययोजना यावर देखील मार्गदर्शन केले.