नागावमध्ये आरोग्य शिबीराचे आयोजन

| अलिबाग | प्रतिनिधी |

नागावमधील सामााजिक कार्यकर्ते अनिरुध्द मंगेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त (दि.17) नागाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. अनिरुध्द राणे मित्रमंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या या शिबीराचा शुभारंभ नागावचे सरपंच निखील मयेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी माजी सरपंच नंदकुमार मयेकर, विद्यमान उपसरपंच रसिका प्रधान, अनिरुध्द राणे, सदस्य श्रीकांत आठवले, मंजुषा राणे, शौकीन राणे, हर्षदा मयेकर, मंगेश राणे, माजी उपसरपंच संदेश नाईक, सामाजिक कार्यकर्ते मंगेश आठवले, माधुरी नाईक, प्रकाश नाईक, शिल्पा आठवले, जयवंत राणे, विकास पिंपळे, संजय म्हात्रे, संजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमधील डॉ. श्रध्दा शिंदे, सोनाली थळे, विनीत पाटील, ओमकार कटक, नितेश म्हात्रे, कल्पेश मोकल, भुषण पाटील आदींसह अनिरुध्द मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी, सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोफत आरोग्य तपासणी शिबीरामध्ये हृदयरोग, मणक्याचे विकार, श्वसनाचे विकार, मुत्राशयाचे विकार, किडनीचे विकार, दातांचे विकार, त्वचारोग, गर्भाशयाचे विकार, नेत्ररोग, पोटाचे विकार, आम्लपित्त, संधिवात, आमवात अशा वेगवेगळ्या आजारांवरील तपासणी करून औषधोपचार देऊन मार्गदर्शन करण्यात आले. या शिबीराला नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

Exit mobile version