आरोग्य शिबिराचे आयोजन

| कोर्लई | वार्ताहर |

मुरुडच्या अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालयामध्ये प्रभारी प्राचार्य डॉ. साजिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आजीवन अध्ययन व विस्तार, राष्ट्रीय सेवा योजना, महिला विकास कक्ष व ग्रामीण रुग्णालय मुरुड-जंजिरा, रायगड यांच्या संयुक्तविद्यमाने 18 वर्षावरील पुरुषांचे व महिलांचे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.

या शिबिरामध्ये ग्रामीण रुग्णालयातील डॉ. निशिगंधा माळी यांच्या टिमने महाविद्यालयातील 20 विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच 28 विद्यार्थिनींची रक्त तपासणी केली. यावेळी निर्मला भोसले, दक्षता चौगले, वैशाली पाटील, श्रुष्टी वाणी, प्रा. शोएब खान, प्रा. नितीन पवार, प्रा. तमसील शहाजहान, प्रा. रहीम बागवान, प्रा. समीक्षा माळी, जय खानविलकर, प्रलय पाणवलकर, अम्मार भालदार यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

Exit mobile version