सुदृढ बालक स्पर्धेचे आयोजन

| मुरुड-जंजिरा | वार्ताहर |

अदानी फाउंडेशन दिघी पोर्ट लिमिटेड माध्यमातुन 28 व्या वर्षपूर्ती निमित्त ग्रामपंचायत वडवली येथे सुदृढ बालक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुले म्हणजे देवाघरची फुले. लहान मुलांना जितके प्रेम आणि आपुलकीने जपाल तेवढे ते आनंदी राहतील. असे उद्गार अदानी फाउंडेशन डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर जयश्री काळे यांनी केले आहे.

बालकांचे आरोग्य आणि पालनपोषण बाबत जागरूकता वाढविण्यासाठी हि स्पर्धा घेण्यात आली होती. तसेच, एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अदानी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विजेत्या स्पर्धकांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय याप्रमाणे एका अंगणवाडी मधील 9 लाभार्थी, एकुण 4 अंगणवाडी मधील 36 बालकांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

या कार्यक्रमात चंद्रकांत बिराडी, संतोष भायदे, श्रुती धुमाळ, दिलीप नाक्ती, भक्ती मांजरेकर, महेश कांबळे, रशीद जजिरकर, मजीद नाईक, अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होते.

Exit mobile version