| कर्जत । वार्ताहर ।
कोंकण ज्ञानपीठ संस्थेच्या वतीने कर्जत तालुक्यातील वसंत हॉलिडेमध्ये आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास पिल्लेवान यांनी उपस्थितांचे स्वागत केले. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन काळे यांनी प्रास्ताविक केलेे. याप्रसंगी संस्थेचे प्रदीपचंद्र श्रुंगारपुरे, अनंतनाथ गौड, दीपक बोराडे, ज्ञानेश्वर जाधव, प्राचार्य डॉ. रवींद्र कटके, अनिल कडू, गणेश मते, याप्रसंगी विनोदकुमार जैन, नरेश जोशी, माधुरी जोशी, पूर्णचंद्र शर्मा, झुलकरनैन डाभिया, प्राचार्य डॉ. बळीराम गायकवाड, डॉ. शिरीष पाटील यांच्यासह संस्थेचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.