मांडवा येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन

। खारेपाट । वार्ताहर ।

टाकादेवी स्पोर्टस क्लब व ग्रामस्थ मांडवा यांचे संयुक्त विद्यामाने, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने अलिबाग रेवस पंचक्रोशी मर्यादित पुरुष कबडृडी स्पर्धेचे आयोजन शनिवारी (दि.20) मांडवा बंदर येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक 10,000 रु., व्दितीय क्रमांक 7,000 रु., तृतीय व चतुर्थ क्रमांकास 5,000 रू. व भव्य चषक अशी आकर्षक बक्षीसे या ठेवण्यात आलेली आहेत. तसेच, सर्वोत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ठ पकड, उत्कृष्ट चढाई व पब्लिक हिरो यांना सायकल व चषक देण्यात येणार आहे. प्रत्येक सामान्यातील सामनावीरास आकर्षक चषक देण्यात येणार आहे. या सामान्याचे खास आकर्षण म्हणून प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ बक्षीस सायकल ठेवण्यात आलेली आहे. ही स्पर्धा मांडवा टाकादेवी क्रिडा नगरी मांडवा बंदर येथे आयोजित करण्यात आल्या असून स्पर्धा सायंकाळी 7 वाजता सुरु होणार आहेत.

Exit mobile version