छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल महानगरपालिकेच्या सातव्या वर्धापनदिन निमित्ताने छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने छायाचित्रण स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. महानगरपालिकेचा 1 ऑक्टोबर रोजी सातवा वर्धापन दिन असून या निमित्ताने अधिकारी व कर्मचारी तसेच महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी यांच्या साठी विविध स्पर्धेचे आयोजन केले आहे. याबरोबरच खुल्या गटासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी छायाचित्रण स्पर्धेचे आयेाजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत फक्त महानगरपालिका हद्दीतील नागरिकच खुल्या गटातून सहभागी होऊ शकतात. एका स्पर्धकांनी किमान तीन छायाचित्रे आपल्या अर्जासोबत 08-12 आकारातील रंगीत छायाचित्रांची प्रत्येकी एक फोटोप्रिंट पाठवावी. स्पर्धकांनी छायाचित्रे पाठविताना छायाचित्रांच्या मागील बाजूस आपले नाव, मो.नं, छायाचित्रणाचे स्थळ नमूद करावे. छायाचित्रासोबत स्पर्धकांनी त्यांचे नाव, मो.नं, पत्ता सर्व आपल्या अर्जामध्ये नमुद करावे. स्पर्धकांनी आपली छायाचित्रे 29 ऑक्टोबर दुपारी 1.30 पर्यंत महापालिकेच्या जनसंपर्क विभागामध्ये पाठविणे बंधनकारक राहील.

छायाचित्रण स्पर्धेचे विषय:- 1. पनवेल महानगरपालिकेचे प्रकल्प, 2. पनवेलचा सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा, 3. पनवेल महापालिका क्षेत्राचा सर्वांगीण विकास दर्शविणारी छायाचित्रे

Exit mobile version