सुधागडमध्ये रानभाजी महोत्सवाचे आयोजन

। पाली/गोमाशी । वार्ताहर ।

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत सुधागड तालुक्यात बुधवार, 10 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता भक्तनिवास हॉल क्रमांक 1 शेजारील हॉलमध्ये रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवामध्ये रानभाजीची वैशिष्ट्ये गुणधर्म आरोग्य विषयक उपयोग तसेच पाककला स्पर्धा इत्यादी आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात रानभाज्या विक्री करण्यात येणार असून इच्छुकानी खरेदी व विक्री करता सहभागी व्हावे. तसेच महिला शेतकरी, महिला गटाने तयार केलेल्या पाककृती फक्त रानभाज्याच्या प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे.स्पर्धेत नंबर मिळालेल्या स्पर्धकाला 15 ऑगस्ट रोजी सुधागड तहसीलदार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी प्राजक्ता काटकर यांच्याशी 8806600146 दि. 9 ऑगस्टपर्यत संपर्क साधावा. तालुक्यातील सर्व नागरिक, शेतकरी व महिला शेतकरी गटांनी या महोत्सवात जास्तीत जास्त सहभाग नोंदवा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी जे.बी. झगडे यांनी केले आहे.

Exit mobile version