| नागोठणे | वार्ताहर |
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन जिल्ह्यातील बचत गट व महिलांसाठी व्यावसायिक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग यांच्या वतीने करण्यात आले होते. खा. सुनिल तटकरे, आ. आदीती तटकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या मार्गदर्शन शिबीराला प्रकल्प संचालक सत्यजित बढे, योगेश भामरे, गुरू हरलैया, चंद्रकांत डोलकर, मधुकर पाटील, नरेंद्रशेठ जैन, भाई टके, शिवराम शिंदे, उमा मुंढे, अॅड. सायली दळवी-जाधव, उदय जवके, प्रीतम पाटील, संतोष कोळी, सचिन कळसकर, सुजाता जवके आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी खा.सुनिल तटकरे,आदिती तटकरे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रिलायन्स कंपनीचे वरिष्ठ अधिकारी अजिंक्य पाटील व रमेश धनावडे यांचे सहकार्य लाभले.