| पनवेल | प्रतिनिधी |
डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त सोनहिरा मित्र मंडळ सीबीडी-नवी मुंबई आयोजित राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन रविवार दि.7 रोजी करण्यात आले होते. सदर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत एकूण 1 लाख 51 हजारांची बक्षिसे ठेवण्यात आलेली होती.
21किलोमीटर स्पर्धेत पुरुष खुल्या गटामध्ये धुळादेव बबन घागरे हा राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा सोनहिरा चषकाचा मानकरी ठरला तर, नऊ किलोमीटर महिला खुल्या गटामध्ये साक्षी जडयाळ, 19 वर्षाखालील मुले अजित लवाटे, 14 वर्षाखालील मुली ऋतुजा बडे, 14 वर्षाखालील मुले अजय राठोड या सर्वांनी अनुक्रमे प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामधून स्पर्धक सहभागी झाले होते.
तसेच, प्रमुख पाहुणे माजी उपमहापौर अनिल कौशिक, वपोनि अशोक वाघसाहेब, सोनहिरा चषक मॅरेथॉन स्पर्धेचे संयोजक डॉ.विलासराव कदम यांच्या उपस्थितीत सर्व विजयी स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच, शिक्षक स्टाफ क्रिकेट स्पर्धेची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी भारती विद्यापीठ नवी मुंबई शैक्षणिक संकुलातील सर्व प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर सेवक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.