राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन

| चिरनेर | प्रतिनिधी |

कोकण मराठी साहित्य परिषद शाखा उरण (मधुबन कट्टा) तर्फे 17 फेब्रुवारीला 100 वे कविसंमेलन संपन्न होणार आहे. 100 व्या कवी संमेलनानिमित्त काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत 75,000 रुपये रोख रकमेची विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहे. स्पर्धेत शंभर पैकी 20 कवी बक्षीस पात्र ठरणार आहेत. उत्कृष्ट कविता आयोजकांकडे व्हाट्सअपवर पाठवावी असे आयोजकांनी सांगितले आहे.

आपल्या कवितेचे परीक्षण करून निवड झाल्यास आपल्याला कळविण्यात येईल. त्यानंतर आपली प्रवेश फी 500रू भरावी लागेल. प्रवेश फी भरल्यानंतरच आपला काव्य स्पर्धेत प्रवेश निश्चित झाल्याचे समजावे असे सांगण्यात आले आहे. प्रवेश फी भरण्यासाठी गुगल पे नंबर 9819652951 असा आहे. निवडलेली कविता ही प्रत्यक्ष परिक्षकांसमोर सादर करावी लागेल. या सादरीकरणातूनच गुणानुक्रमे प्रथम, व्दितीय, तृतीय, चतुर्थ व उत्तेजनार्थ क्रमांक जाहीर केले जातील. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाईल. कविता पाठवण्याची अंतिम मुदत 10 जानेवारी 2024 पर्यत असणार आहे. यासाठी मच्छिंद्रनाथ म्हात्रे 9819652951 याच्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version