“सुरुवात मंदिर पर्वाचे” हरिहरेश्वर येथे आयोजन

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

यावर्षी प्रथमच 1 सप्टेंबरला श्री क्षेत्र हरिहरेश्वर मंदिराच्या पटांगणात सुरुवात मंदिर पर्वाची संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाची सुरुवात देवावर सामूहिक अभिषेक देवस्थानचे अध्यक्ष वामन बोडस यांचे हस्ते करण्यात करण्यात येणार आहे. सांगता सामूहिक आरतीनंतर होईल. मंदिर व्यवस्थापकांचे हिंदू मंदिर संघटन करणे, मंदिर व्यवस्थापन पद्धत याबाबत चर्चा व मार्गदर्शन करणे, भविष्यांतील व्यवस्थापनाबाबत करण्यात येणारी तयारी किंवा अपेक्षा, धार्मिक पर्यटनाबाबत चर्चा व मार्गदर्शन करणे, मंदिरांचे सामाजिक जीवनात असलेले महत्त्व व कथा कीर्तनांचे आयोजन करण्यासंबंधी चर्चा करणे, प्रसाद, महाप्रसाद किंवा नित्य प्रसाद वाटप व्यवस्थापन यावर चर्चा करणे. सदर संमेलनाची उद्दिष्टे आहेत. संमेलन सकाळी 9=30 ते दु. 3 या वेळांत होणार आहे.

Exit mobile version