| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्री काशी क्षेत्र वाराणसी येथे भारतातील विविध मंदिराच्या प्रतिनिधींचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये भारतातील तब्बल 700 मंदिर विश्वस्त, प्रमुख व्यवस्थापक, पुजारी तसेच इतर संबंधित अधिकारी सहभागी झाले होते. अधिवेशनात श्रीवर्धन तालुक्यातील श्री देव हरिहरेश्वर कालभैरव मंदिराचे वतीने देवस्थान सचिव -खजिनदार सिद्धेश सुनिल पोवार व विश्वस्त निनाद राजेंद्र गुरव हे अधिवेशनात उपस्थित राहिले होते.
त्याचप्रमाणे सिद्धेश पोवार यांनी सुचविल्यानुसार धावीर महाराज देवस्थान, रोहा व विरेश्वर देवस्थान,महाडच्या प्रतिनिधींसाठी अधिवेशनात सहभाग होता. तसेच बल्लाळेश्वर मंदिर,पाली व महड देवस्थान, महड यांचेही प्रतिनिधी अधिवेशनात उपस्थित होते.
अधिवेशनात महाराष्ट्रातील मंदिरांबाबत विशेष चर्चा करण्यात आली. भविष्याचे दृष्टीने महाराष्ट्राचे बहुतांश मंदिरांचा एकत्रितपणे व्हॉट्स ॲप ग्रुप तयार करण्यात आला असून त्यांचे प्रमुख प्रतिनिधीत्व निनाद गुरव व सिद्धेश पोवार यांचेकडे देण्यात आले आहे.या जागतिक अधिवेशनाचे आयोजन आमदार प्रसाद लाड, गिरीश कुलकर्णी यांनी केले होते.या अधिवेशनास मअतुल्य भारतफ अंतर्गत भारत सरकारचा पाठिंबा लाभला असून अधिवेशनाचा प्रारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मा.मोहनजी भागवत यांचे मार्गदर्शनाने करण्यात आला. भारतात प्रथमच अशा प्रकारचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. अधिवेशनात असलेल्या सिद्धेश पोवार व निनाद गुरव यांच्या सहभागाने श्रीवर्धन तालुक्याची मान उंचावली आहे.