शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
। रेवदंडा । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील रेवदंडा हायस्कूलच्या पटांगणात श्री छत्रपती शिवाजी मंडळ रेवदंडा-चौल यांच्यावतीने 69 वी पारंपारिक कुस्ती स्पर्धेचे आयोजन शुक्रवारी (दि.1) करण्यात आले होते. या कुस्ती स्पर्धेत खुल्या गटात वाडगाव आखाडा प्रथम क्रमांकाचा विजेता ठरला आहे. तसेच, आंदोशी आखाडा द्वितीय, तर बेलोशी आखाडा तृतीय क्रमाकांचा मानकरी ठरला आहे.
या कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री छत्रपती शिवाजी मंडळाचे अध्यक्ष सुरेश खोत, हेमंत गणपत, शरद वरसोलकर, सदाशिव मोरे, रायगड जिल्हा व अलिबाग तालुका कुस्ती संघटना अध्यक्ष जयेंद्र भगत तसेच भालचंद्र गुरव, अजीत पाटील, चंद्रकांत धाटावकर, बाळु नवखारकर, महेश ठाकूर, जयंत शिंदे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थिती होती.
या कुस्ती स्पर्धेत वाडगांव, आंदोशी, बेलोशी, वळवली, यशवंतखार असे आखाडे सहभागी झाले होते. यामध्ये खुल्या गटात एकूण 45 कुस्त्या तर प्रेक्षणीय 15 कुस्त्या खेळविण्यात आल्या होत्या. स्पर्धेत पंचाचे काम राष्ट्रीय पंच रविंद्र घासे, वैभव मुकादम, सुधाकर पाटील, वासुदेव पाटील, मिलिंद भगत, संदिप मोरे यांनी पाहिले. तर टाईम किपरचे काम भालचंद्र गुरव यांनी उत्कृष्टरित्या सांभाळले.