| मुरुड | वार्ताहर |
राष्ट्रीय आरोग्य न्याय संशोधन संस्था संचलित नूतन स्कूल ऑफ नर्सिंग येथे (दि.08) जागतिक महिला दिनानिमित्त परिचारिका विद्यार्थिनींसाठी जिल्हा क्रीडा कार्यालय अलिबागतर्फे कराटे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये परिचारिका विद्यार्थिनींचा मोठा सहभाग होता. समाजामध्ये महिला व मुलींवर होणार्या अत्याचार लैंगिक, मानसिक व शारीरिक शोषण यांच्या पार्श्वभूमीवर मुलींना स्वरक्षणाचे धडे देण्याची त्यातून महिला व मुलींचे सबलीकरण व सशक्तीकरण करण्याची नितांत गरज असल्यामुळे यासाठी परिचारिका विद्यार्थिनीना कराटे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल असे मत संस्थेच्या अध्यक्षा डॉ. नूतन माळी, डॉ.रामलिंग माळी, तुषार दिवेकर यांनी व्यक्त केले.
तसेच, महिला दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये वादविवाद, कलादालन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास मुरुड पोलीस स्टेशनच्या पी.एस.आय निशा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य-उपप्राचार्य व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.





