आमदार भाई जयंत पाटील व्यायामशाळा वेश्‍वीतर्फे आयोजन

ओमकार रायगड श्री शरीर सौष्ठव स्पर्धा
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड बॉडी बिल्डींग असोसिएशन, महाराष्ट्र राज्य बॉडी बिल्डींग असोसिएशन व इंडियन बॉडी बिल्डींग फेडरेशनच्या मान्यतेने मार्च रोजी आमदार भाई जयंत पाटील व्यायामशाळा वेश्‍वी तर्फे ओमकार रायगड श्री शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत विजेत्याला 25 हजार रुपये रोख तर उपविजेता 10 हजार तसेच बेस्ट पोझरला 3 हजार रुपये पारितोषीक दिले जाणार आहे. तसेच प्रथम क्रमांकासाठी 4 हजार रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकासाठी 3 हजार रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक, तृतीय क्रमांकासाठी 2 हजार रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक, चतुर्थ व पाचव्या क्रमांकासाठी प्रत्येकी 1 हजार रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. सदर स्पर्धा रायगड, मुंबई शहर, ठाणे, मुंबई उपनगर या जिल्ह्यांसाठी व नवी मुंबईसाठी खुली असून आयबीबीएफ च्या नियमानुसार खेळविण्यात येणार आहे. रायगड श्री गट 55, 60, 65, 70 व 75 किलो वजनी गटात घेतला जाणार असून स्पर्धेच्या वेळी 75 वरील वजनी स्पर्धक वाढल्यास गट वाढवायचा कि नाही हा निर्णय पुर्णपणे आयोजकांचा राहील. वजन तपासणीची वेळ सायंकाळी 4.30 ते 6 पर्यंत असणार आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संजय उले 9881889115, किरण भगत 9273502199, परशुराम चव्हाण 8888935602, अशिष खोत 8149200233, राजेंद्र गाणार, 9923063536, मकरंद पलंगे 8928063224, मनिष पाटील 8806448980, अतिष पाटील 9673512417 तसेच अंकित शेळके 8237573779 येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version