भारतीय तटरक्षक दलातर्फे बाईक रॅलीचे आयोजन

| मुरूड | प्रतिनिधी |

अढळ धैर्य आणि बांधिलकीने सागरी सीमांचे रक्षण करण्याच्या सेवेचे मर्म तसेच राष्ट्रसेवेत तैनात शूर सैनिकांच्या मूल्यांचे प्रतिबिंब असलेल्या कर्तव्य आणि समर्पणाच्या संकल्पावर प्रकाश टाकून मच्छीमार समुदायांमध्ये देशभक्ती आणि जागृतीचा संदेश देण्याचा उद्देशाने बाईक रॅलीचे पथक कोची, बेपोर, न्यू मंगलोर , गोवा मार्गे आणि रत्नागिरी मार्गे किनारपट्टीवरील विविध मच्छीमार समुदायांशी संवाद साधत 30 जानेवारी 2024 रोजी मुरुड जंजिरा येथे पोहचले.

31 जानेवारी रोजी 10 दुचाकींसह 20 जणांच्या बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखवत मार्गस्थ केले. हे पथक मुरुडमार्गे 1 फेब्रुवारी रोजी मुख्यालय, तटरक्षक क्षेत्र (पश्चिम), मुंबई येथे पोहचले. पुढील 03 दिवसात मुरुड जंजिरा आयसीजी युनिटमधील सेवारत कर्मचारी यांचे पथक तसेच दमणच्या आयसीजी युनिट्समधील पथकासोबत सामील होणार असुन भारतीय तटरक्षक दलातील धैर्य आणि साहसाची भावना जागृत करून एकजूट आणि सहकार्याची भावना वाढविण्यासाठी स्थानिक समुदायांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहेत. या सत्तेचाळीस वर्षांच्या राष्ट्रसेवेतील कामगिरीचे स्मरण करण्यासाठी 01 फेब्रुवारी 2024 रोजी भारतीय तटरक्षक दल आपला 48 वा स्थापना दिवस साजरा करत आहे. 01 फेब्रुवारी 1977 रोजी स्थापन झालेल्या भारतीय तटरक्षक दलाची स्थापना तेव्हापासून भारताच्या सागरी हिताचे रक्षण, किनारपट्टीच्या सीमांचे रक्षण आणि आपल्या अखत्यारीतील विस्तीर्ण सागरी क्षेत्रात सागरी सुरक्षा सुनिश्चित करण्यात अग्रेसर असलेल्या “वयम रक्षामः“ हे ब्रीद हे सार्थ ठरले आहे.

सदर बाईक रॅली राजपुरी, मुरुड आणि बोर्ली या ग्रामीण भागातून मार्गस्थ झाली. सागरी सुरक्षेच्या उपाययोजना, सागरी नियमांचे पालन, पर्यावरण संवर्धन, ‘बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान’ आदींबाबत जनजागृती करण्यासाठी सामुदायिक संवाद कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. रॅली दरम्यान या पथकाने डोंगर दऱ्यात आणि खडतर रुळांवरून एकत्र प्रवास करत एकता आणि सौहार्दाचे प्रतीक म्हणून या मार्गावरील दुर्गम मच्छीमार समुदाय तथा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करून देशसेवेची वचनबद्धता घेतली.

Exit mobile version