। अलिबाग । वार्ताहर ।
महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्यावतीने ‘शाळेत बुद्धिबळ’ या उपक्रमांतर्गत प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन 12 जानेवारी रोजी अलिबाग येथे करण्यात आले आहे.
हे शिबीर एक दिवसाचे असून शाळेसाठी बुद्धिबळ प्रशिक्षक होण्यासाठी आवश्यक असणार्या सर्व प्रकारच्या प्रशिक्षणाचा अंतर्भाव करण्यात आलेले आहे. यामध्ये प्रामुख्याने बुद्धिबळातील शालेय अभ्यासक्रम, तांत्रिक कौशल्ये, इंटरनेट व वेबसाईट सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर बुद्धिबळासाठी करण्यासंबंधीत सर्व प्रकारची माहिती देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील 18 वर्षापुढील बुद्धिबळाची आवड असणारे विद्यार्थी, खेळाडू, प्रशिक्षक, पालक तसेच क्रीडा शिक्षक या प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी विलास म्हात्रे (8888011411), संदिप पाटील (9920351583), सी.एन. पाटील (9326504179) यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार आणि चेस इन स्कुलचे सेक्रेटरी विलास म्हात्रे यांनी केले आहे.







