| सुकेळी | वार्ताहर |
पेण तालुक्यातील श्री.क्षेत्र कुरनाड येथे रविवार दि.25 व 26 फेब्रुवारी असे दोन दिवस अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वानंद सुखनिवासी संत श्री.सद्गगुरु स्वामी गणेशनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने, सद्गगुरु स्वामी अरविंदनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच दत्ताराम महाराज यांच्या प्रेरणेने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात रविवारी सकाळी सर्व कुरनाड ग्रामस्थांच्या उपस्थितीत मुर्तींस अभिषेक, ध्वजारोहण, कळश स्थापना झाल्यानंतर ज्ञानेश्वरी वाचनाला सुरुवात होईल. सांय. 4 ते 5 या वेळेत ह. भ. प. भगवान सर (वरप) यांचे प्रवचन झाल्यानंतर श्री . विठ्ठल रखुमाई हरिपाठ मंडळ जांबोशी यांचा हरिपाठ तर ह. भ. प. डॉ.कैलास महाराज निश्चिते ( ठाणे- शहापुर) यांची किर्तन सेवा होणार आहे. दुसर्या दिवशी सोमवारी ह. भ. प. जगदीश महाराज शिंदे (कोंढवी) यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर ग्रामस्थ मंडळ कुरनाड यांच्यातर्फे आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसाद देऊन या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ व जय हनुमान क्रिकेट संघ कुरनाड हे मेहनत घेत आहेत.