‘माझा गणपती’ कार्यशाळेचे आयोजन

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचालित युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरुकुल विभागातील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हस्तकौशल्यातून बनवलेल्या आकर्षक गणेश मूर्तींचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. गुरुकुल विभागामार्फत प्रेमजी भाई आसर प्राथमिक विभागातील चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘माझा गणपती’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत इयत्ता चौथीच्या 280 विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. यावेळी कार्यशाळेत मुलांना शाडू माती पासून गणपती तयार करणे विषयी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक गुरुकुलातील अध्यापक पराग लघाटे यांनी केले. यानंतर मुलांनी आपल्या कल्पनांचा उपयोग करून शाडू मातीच्या छान आकर्षक गणेश मूर्ती तयार केल्या. गुरुकुलातील आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांनी चौथीच्या कार्यशाळेतील सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक व सहाय्यक म्हणून मदत केली आणि पूर्ण दिवसभर कार्यशाळेचे व्यवस्थापन करण्याचा अनुभव घेतला.

Exit mobile version