| वेनगाव | वार्ताहर |
कर्जत खालापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सुधाकर घारे प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून कर्जत खालापूर या दोन तालुक्यासाठी रिल्स स्टार स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत असंख्य तरुण तरुणी यांनी सहभाग घेत या स्पर्धेला वेगळ्या उंचीवर नेले होते. या स्पर्धेचा निकाल 10 डिसेंबर रोजी कर्जत येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला.
या प्रसंगी व्यासपीठावर राजिपचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, शरद कदम, भगवान भोईर, रंजना धुळे, प्राची पाटील, भारती पालकर, राम कोळंबे, मधुरा चंदन, बळीराम देशमुख, केशव मुने, सोमनाथ पालकर, भूषण पेमारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी या स्पर्धेमधून एकूण 130 स्पर्धक निवडण्यात आले असून त्यातून रांगोळी सादर केलेले कैलास खंडू पाटील खालापूर हे प्रथम, किल्ले साकारलेले समर्थ राकेश सिंग द्वितीय, लक्ष्मीची प्रतिमा साकारलेल्या प्रतिभा विनायक बारणे या तृतीय असे तीन क्रमांकासह स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.







