| कर्जत | वार्ताहर |
कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयातील सेमिनार हॉलमध्ये राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानचे आयोजन केले होते. प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल व समर्थ ट्रेनिंग स्कूल कर्जत विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सहाय्यक प्रादेशिक परिवहन आधिकारी गजानन ठोंबरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले. याप्रसंगी पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड, संस्थेचे विश्वस्त झुलकरनैन डाभिया, मोटार वाहन निरीक्षक सचिन विधाते, अजय कराळे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रीती पवार, सारथी सुरक्षा सेवा संस्थेचे विनय मोरे, डॉ. रुपाली येवले, डॉ. प्रदिपकुमार वाहुळे, प्रा. मनिषा चौधरी, अभिजीत मराठे आदी उपस्थित होते.
महाविद्यालयीन विकास समिती सदस्य विजय मांडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. पोलिस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी रस्ता अपघात होण्याची मुख्य कारण व वाहतुकीचे नियम पाळणे किती महत्त्वाचे आहे याविषयी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले, तर प्रिती पवार यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मासिक अंतर्गत होणार्या मरिलफ स्पर्धेविषयी माहिती दिली. याप्रसंगी निलेश मराठे, डॉ. निलोफर खान, डॉ. सतीश पांडव, डॉ. उज्वला ठुबे, अनिकेत इंदुलकर, प्रा. मालोजी रानवरे, प्रा. श्वेता दंगत, प्रा. अश्विनी भोईर, प्रा. पूजा मोधले, प्रा. प्रणिता बांगरे, प्रा. अस्तिया खान, प्रा. काजल खरात, प्रा.चेतना वाघ आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रिया खापे तर आभार प्रदर्शन प्रा.अक्षता गिध यांनी केले.







