मतदार जनजागृतीसाठी पथनाट्याचे आयोजन

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |

नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून देण्यासाठी महाविद्यालचे प्रभारी प्राचार्य डॉ. साजिद शेख व तहसीलदार रोहन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखली अंजुमन इस्लाम जंजिरा विज्ञान पदवी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग, निवडणूक साक्षरता क्लब व तहसील कार्यालय मुरुड यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालय व मुरुड बाजारपेठ येथे पथनाट्य सादर करण्यात आले होते. याप्रसंगी मुरुड शहरात प्रभातफेरी काढण्यात आली होती. यावेळी तहसीलदार रोहन शिंदे, महाविद्यालाचे चेअरमन जैनुद्दीन कादरी, इस्माईल शेख, प्राचार्य डॉ.साजिद शेख, निवडणूक नायब तहसीलदार चंद्रशेखर खोत, साहिल वाळंज हे उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. नितीन पवार, प्रा.अल्ताफ फकीर, प्रा. तमशील शाहजहान, जय खानविलकर, सौलिहा कडू, अमोघ मयेकर, रिया ठाकूर, क्रीपा धुमाळ, रिद्धी भगत, तमीम उलडे, अरफात लसणे, उसामा नखतारे, हुमेरा घारे, ओमकार म्हात्रे, इमादउद्दीन गजगे, इब्राहिम शेख, ईश्वरी चोगले, अभय मोन्नाक, सार्थक चोरगे यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version