जात प्रमाणपत्र काढण्यासाठीशिबिराचे आयोजन

| उरण | वार्ताहर |

उरण सामाजिक संस्था व टाटा स्टील फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 21 डिसेंबर रोजी खालापूर तालुक्यातील उंबरे ग्राम पंचायतीमधील सतीमाल आदिवासी वाडी, सतरा आंबा आदिवासी वाडी, खालचे उंबरे आदिवासी वाडी येथील कातकरी जमातीच्या लोकांचे जातीचे दाखले काढण्याचे शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

कोंकण विभागीय आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय अधिकारी कर्जत अजित नैराळे, तहसीलदार खालापूर आयुब तांबोळी यांच्या सहकार्याने हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात एकूण 85 लोकांचे फॉर्म्स भरण्यात आले होते. सदर कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी अजित नैराले, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, तहसीलदार आयुब तांबोळी, मंडळ अधिकारी श्री खोत, तलाठी श्री सरगर, आदिवासी विकास निरीक्षक निलेश सोनवणे, विस्तार अधिकारी शैलेश तांडेल, ग्राम सेवक पिंपळकर, ग्राम पंचायत कर्मचारी भास्कर आईत, जगन कातकरी, नितीन मुसळे, महेश पाटील, दत्ता गोंधळी, नामदेव ठाकूर, मनीष कातकरी, रत्नाकर घरत, प्रा राजेंद्र मढवी, टाटा स्टील फाऊंडेशनचे समन्वयक उदय हे उपस्थित होते.

Exit mobile version