मुरुडमध्ये दिव्यांगांसाठी शिबिराचे आयोजन


| मुरूड | जंजिरा |

दिव्यांगांना भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय व राज्य शासनाच्या योजनेंतर्गत आवश्यक ती सहायक उपकरणे उपलब्ध करून देण्याकरिता तपासणी शिबिराचे आयोजन मुरुडमध्ये शुक्रवार (दि.22) डिसेंबर रोजी दरबार हॉलमध्ये करण्यात आले आहे. मुरुड तालुक्यातील सर्व दिव्यांगांनी 22 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता उपस्थित राहताना सोबत उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, दिव्यांग दाखला, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, अपंगत्व प्रमाणपत्र, दोन पासपोर्ट साईज फोटो बरोबर घेऊन यावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

यावेळी दिव्यांगांना कृत्रिम अवयव उपलब्ध करून देण्यासाठी शिबिरात तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्याकडून तपासणी व मोजमाप घेण्यात येणार आहे. तसेच तपासणी अंती त्यांना कृत्रिम हात, पाय, व्हिलचेअर, ब्लाईंड डिजिटल स्टिक, कानाचे डिजिटल श्रवण यंत्र, मतिमंदांसाठी शैक्षणिक किट, ऐंशी टक्क्यांहून अधिक अस्थिव्यंग असणाऱ्यांना बॅटरीवर चालणारी तीन चाकी सायकल, उच्च शिक्षण घेणाऱ्या शंभर टक्के अंध दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्मार्टफोन आदी उपकरणे पुरवली जाणार आहेत. अशी माहिती मुरुड तालुका पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी जी. एम. लेंडी यांनी एका पत्राद्वारे तालुक्यातील ग्रामपंचायतींना कळविण्यात आले आहे.

Exit mobile version