| कोर्लई | वार्ताहर |
मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात हज यात्रेकरूंसाठी आरोग्य तपासणी व लसीकरण शिबीर दि. 16,17 व दि. 23 मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्हयातून सन 2023 मध्ये हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरुंसाठी तपासणी व लसीकरण शिबिराचे आयोजन करावे व यात्रेकरूंची आरोग्य तपासणी करून त्यांना लस देण्यात यावी असे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक, अलिबाग-रायगड या कार्यालयाकडून प्राप्त झालेले आहेत. त्यानुसार ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे सकाळी 9.00 ते सायंकाळी 05.00 या वेळेत करण्यात आलेले आहे. तरी हज यात्रेला जाणाऱ्या सर्व यात्रेकरूंनी आपली आरोग्य तपासणी व लसीकरण करुन घेण्यात यावे, असे ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.