जेष्ठ नागरिक संघाच्या समन्वय सभेचे आयोजन

| रोहा | प्रतिनिधी |

रा.जि.जेष्ठ नागरिक संघाच्या समन्वय समितीच्या कार्यकारिणी मंडळाच्या द्वैमासिक सभेचे आयोजन रविवार दि. 28 जाने. रोजी स.11 वा. रोहा तालुक्यातील खांब येथे करण्यात आले आहे. संघाचे उपाध्यक्ष अविनाश म्हात्रे यांच्या खांब येथील मुंबई-गोवा महामार्गानजिक अपूर्व या निवासस्थानी ही सभा संपन्न होणार असून या सभेमध्ये मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करणे, मागील द्वैमासिक सभेनंतर झालेल्या जमा खर्चास मंजूरी देणे, संघटात्मक कामाचा आढावा घेणे व मा.अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळच्या विषयावर चर्चा करणे आदी विषयांवर चर्चा केली जाणार असून जास्तीत जास्त सभासद बंधू आणि भगिनी यांनी या सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version