। उरण । वार्ताहर ।
छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे उरण तालुका मर्यादित भव्य असे किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची ओळख व्हावी, गडकिल्ल्याचे संवर्धन व्हावे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांसमोर आणण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात येत असून, दिवाळीदरम्यान बनविलेले गड किल्ले यांची माहिती, फोटो, किल्ला बनविणार्या बालकांची नावे किंवा ग्रुपचे नाव, संपर्क क्रमांक आदी माहिती संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील 8097100073, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे 9702751098 यांच्या व्हॉट्सअॅपवर पाठवावे. प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ 2 असे एकूण 5 विजयी उमेदवारांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.