चौकामध्ये भव्य मशाल रॅलीचे आयोजन

| रसायनी | वार्ताहर |

उंबरखिंड लढाईचा 363 वा विजयी दिन नेताजी पालकर सिनियर ग्रुप चौक यांच्यावतीने मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला, संपुर्ण चौक बाजारपेठमधुन भव्य मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत आणि ऐतिहासिक क्षणचित्रे उभी साकारण्यात आली होती.

छत्रपती शिवाजी महाराज स्वतः ज्या लढाईत होते, ती ऐतिहासिक लढाई रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात उंबरखिंड येथे 2 फेब्रुवारी 1661 रोजी झाली, खानाचा सरदार कारतलब खान याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुढे शरणागती पत्करली आणि खंडणी देऊन, शस्त्रे खाली ठेऊन आल्या पावली परत निघाले. सरनौबत नेताजी पालकर यांची जन्मभूमी चौक असल्याने ग्रुपग्रामपंचायत चौक व तुपगाव, नेताजी पालकर सिनियर ग्रुप चौक, विविध महिला मंडळ, विद्यार्थी, ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरीक मोठ्या उत्साहाने विजयी दिन साजरा करतात. खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी, संजय कोंदीलकर, रविंद्र कुंभार, प्रफुल्ल विचारे, श्याम साळवी, जगदीश हातमोडे, शोभा देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराज, नेताजी पालकर, मां जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करून, मशाल प्रज्वलित करण्यात आली. त्या नंतर संपुर्ण ग्रामस्थ, महीला व नेताजी पालकर विद्यामंदिर चौक विद्यार्थी यांनी संपुर्ण चौक बाजारपेठतून ढोल ताशांच्या गजरात ही रॅली काढण्यात आली.

Exit mobile version