। चिपळूण । प्रतिनिधी ।
क्राऊन मोटार ट्रेनिंग स्कूल चिपळूण येथे वाढत्या अपघातांवर नियंत्रण आणण्याकरिता रस्ता सुरक्षा या विषयांवर गुरुवार दि. 22 मे रोजी व्याख्यान ठेवण्यात आले आहे. या संदर्भात देशांतल्या विविध ठिकाणी रस्ता सुरक्षा विषयावर व्याख्यान देणारे प्रसिद्ध व्याख्याता एकनाथ सहस्त्रबुद्धे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. शहरातील सर्व वाहनचालकांनी उपस्थित राहून या रस्ता सुरक्षा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्राऊन मोटार ट्रेनिंगचे संचालक इब्राहिम सरगुरोह यांनी केले आहे. क्राऊन मोटार ड्रायव्हिंग स्कूल, कडवेकर चेंबर्स इ-3 बाजारपेठ काणे बंधू हॉटेल समोर, बाजारपेठ चिपळूण येथे हा कार्यक्रम होणार आहे.