म्हसळा । वार्ताहर ।
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसळा तालुक्यात घरोघरी तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. त्याचा एक भाग म्हणून श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी अमित शेडगे यांच्या संकल्पनेतून तहसिलदार कार्यालय येथे क्रांतीवीरांना अभिवादन करुन मोटारसायकल रॅलीचे उद्घाटन करण्यात आले.
यामध्ये मांदाट, पाष्टी खानगाव, कमावर, अवित, कॉझरी, तळवडे, आडीमहाडखाडी, केल्टे, घुम, भापट, गॉडघर, मैदडी, खरसई, वरवठणे, बनोटी, पाभरे, चारळ, देवघर, सकलप व म्हसळा शहराच्या परिसरातील एकूण 200 मोटारसायकलस्वारांनी सहभाग घेतला होता. या मोटारसायकल रॅलीला अंजुमन हायस्कूल येथे म्हसळा तहसिलदार समीर घारे यांनी संबोधित करुन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्याबाबत आवाहन केले. या रॅलीमध्ये तहसिलदार समीर घारे, गटविकास अधिकारी श्री.पोळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक उध्दव सुर्वे, निवासी नायब तहसिलदार गणेश तेलंगे, धर्मराज पाटील, संजय कणिक, संजय दिवेकर, चंद्रकांत पवार,अनिल जोशी, गणेश बोले, रमेश खोत, निलेश मांदाडकर, अनंत कांबळे, रियाज फकीह, शेखर खोत, बाबू शिके तसेच शिक्षक, तहसिलदार व इतर कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेतला.