इमेज कॅलेंडरसाठी छायाचित्र स्पर्धेचे आयोजन

अलिबाग | वार्ताहर |
अलिबागमधील तीन वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या वतीने इमेज कॅलेंडर 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे तिसर वर्ष आहे. यासाठी मोफत छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील 12 विजेत्यांची छायाचित्रे या कॅलेंडरमधील प्रत्येक महिन्याच्या पानावर छापण्यात येणार असून, त्याबाबतचे आकर्षक प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळ आणि निसर्गचित्र असे विषय ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेत सहभागी घेऊ इच्छिणार्‍यांनी 8द12 साईजमध्ये सॉफ्ट कॉपी मेल करावी. तसेच फोटो 30 सप्टेंबरपर्यंत खाली दिलेल्या इमेल आयडीवर पाठवावेत. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी जितू शिगवण 9890905156, समीर मालोदे 9423375361, रमेश कांबळे 9623973663 यांच्याशी संपर्क साधावा. आपला फोटो jshigwan9gmail.com या संकेतस्थळावर पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version