जिल्ह्यात कृषी संजीवनी मोहिमेचे आयोजन

। अलिबाग । वार्ताहर ।
खरीप हंगाम 2022 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोहचविण्यासाठी राज्यातील कृषी विभागाचे अधिकारी/ कर्मचारी, कृषी विभाग जिल्हा परिषद, कृषी विद्यापीठे/ कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, कृषीमित्र शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करीत आहेत. त्यानुसार दि.25 जून ते दि.01 जुलै या कालावधीत प्रत्येक दिवशी महत्त्वाच्या मोहिमांवर विशेष भर देवून कृषी संजीवनी मोहीम साजरा करण्यात येणार आहे.


या मोहिमेच्या कालावधीमध्ये संबंधित विषयांबाबत जिल्ह्यात प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार असून गावोगावी शेतीशाळा, चर्चासत्र, वेबिनार, प्रात्यक्षिके, सभा प्रशिक्षण, शिवारफेरी यांच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील रिसोर्स बँकेतील पुरस्कारप्राप्त प्रगतशील शेतकर्‍यांचे सुध्दा मार्गदर्शन या माध्यमातून शेतकर्‍यांना मिळणार आहे. तसेच अधिक माहितीसाठी आपल्या गावाच्या कृषी सहाय्यक तसेच नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती बाणखेले यांनी कळविले आहे.

Exit mobile version