कनेक्ट एक्स्पो 2024 चे आयोजन

। पनवेल । वार्ताहर ।

बँक ऑफ महाराष्ट्र आणि तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने महा एमएसएमई आणि ग्राहक कनेक्ट एक्स्पो 2024 चे आयोजन तळोजा एमआयडीसी मधील हॉटेल तनिश रेसिडेन्सी या ठिकाणी 4 जानेवारी 2024 रोजी, सकाळी 10:45 पासून करण्यात आले आहे.

सूक्ष्म आणि लघु उद्योगांना पाठिंबा देण्यासाठी या एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. विविध प्रकारचे कर्ज देणे, तत्काळ कर्ज प्रकरणास मंजुरी देणे, आदी सुविधा तत्काळ या एक्स्पोमध्ये उद्योजकांना मिळणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजेश कुमार सिंग – महाप्रबंधक, रिटेल आणि एमएसएमई, मुख्य कार्यालय, पुणे तसेच संदिप चौरसिया, उपमहाप्रबंधक व झोनल मॅनेजर, नवी मुंबई क्षेत्र, उपस्थित राहणार आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र ने ह्या सुवर्ण संधीचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

Exit mobile version