सायबर सुरक्षा अभियानाचे आयोजन

। चिपळूण । वार्ताहर ।
ऑक्टोबर 2021 हा सायबर सुरक्षा जनजागृती महिना म्हणून National Cybersecurity -lliance यांनी जागतिक स्तरावर घोषित केला आहे. लवेल येथील घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजिच्या संगणक विभागातर्फे सदर औचित्य साधून 1 ते 30 ऑक्टोबर दरम्यान विविध गावांमध्ये जाऊन संपूर्ण महिनाभर जनजागृती व अनेक उत्तम वेबिनार आयोजित केले आहेत.


येथील मुलांनी सायबर सुरक्षा विषयी जनजागृती पूर्वक अशी पत्रके तयार केली आहेत. ज्या अंतर्गत अनेक संकल्पना आणि त्यातून स्वतःला वाचवण्याचे मार्ग याविषयी खूप सुंदर पद्धतीने यांची मांडणी यामध्ये केली आहे. सदर उपक्रमांचे उदघाटन रत्नागिरीचे पोलीस उपनिधीक्षक राजेश कानडे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यावेळी प्रतीक ओक, महेश खांडके, डॉ बने, डॉ जोशी उपस्थित होते.

Exit mobile version