| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील बालाजी रेसिडेन्सी, हेदुटणे तालुका पनवेल येथील रहिवासी व परिसरातील रहिवाशांची सायबर सुरक्षा/जनजागृतीसंदर्भात नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेही सायबर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सायबर गुन्हेगारी व सायबर सुरक्षाबाबतचे मानवी साखळीद्वारे जनजागृती करून प्रशिक्षण देण्यात आले.
यामध्ये मोबाईल, इंटरनेट, ऑनलाइन शॉपिंग, फेक लिंक, इंस्टाग्राम फेसबुक फ्रॉड, मालवेअर, फोन पे, गुगल पे फ्रॉड, ऑनलाइन ट्रेडिंग फ्रॉड, डिजिटल अरेस्ट फ्रॉड, एनसीसीआरपी पोर्टल व हेल्पलाइन क्रमांक 1930 बाबत माहिती देण्यात आली. तसेच नवी मुंबईच्या व्हॉट्सॲप व इंस्टाग्राम पेजची माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांनी पोलिसांना विविध प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची समर्पक अशी उत्तरे पोलिसांकडून देण्यात आली. त्या उत्तराने नागरिकांनी समाधान व्यक्त करुन पोलिसांचे आभार मानले.





