जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन

। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील आंबेवाडी जिल्हा परिषद मतदान संघातील कोलाड विभाग कबड्डी असोसिएशनच्या पाले बुद्रुक येथील मैदानावर रविवार, दि.1 मे रोजी संध्याकाळी 5 वा. महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून शिवसेनेचे रोहा तालुक्याचे उपतालुकाप्रमुख चंद्रकांत लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतर्फे जिल्हास्तरीय भगवा चषक कबड्डीचे आयोजन करण्यात येणार आहे.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक 51,000/- रु. व आकर्षक चषक, द्वितीय 25,000/- रु. व आकर्षक चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकास 15,000/- रु. व आकर्षक चषक, मालिकावीर सायकल, उत्कृष्ट पक्कड कुलर, उत्कृष्ट चढाई कुलर, पब्लिक हिरो टॉवर फॅन अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी रमेश सानप 7809122999, मिलिंद पवार 9860250287, चंद्रकांत लोखंडे 9421168033, ज्ञानेश्‍वर खांमकर 9975684753 यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version